आमच्याविषयी

महाराष्ट्र राज्यात कोल्हापूर जिल्हात कागल तालुका मधील कागल निढोरी राज्यमार्गाच्या पूर्वेला १ किलोमीटर अंतरावर वसलेले आणि फोंडे पिंपळगाव म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेले पिंपळगाव बु हे गाव कष्टकऱ्यांचे गाव म्हणूनही ओळखले जाते

पिंपळगाव बु  ग्रामपंचायत ही सन १९५७ सालापासून कार्यरत असून ९  सदस्य संख्या आहे.

ग्रामपंचायतीस संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान, तंटामुक्त गाव पुरस्कार, यासारखे विविध पुरस्कार मिळालेले आहेत.

कागल निढोरी या राज्यमार्गाच्या पूर्वेला १ किलोमीटर अंतरावर वसलेले आणि फोंडे पिंपळगाव म्हणून संपूर्ण राज्यात प्रसिध्द असलेले पिंपळगाव बु हे गाव कष्टकऱ्यांचे गाव म्हणूनही ओळखले जाते . डोंगर नाही, नदी नाही,अशा प्रकारे निसर्गाने अन्याय केलेल्या या गावाने केदार्लिंग (खंबलिंग ) देवावर श्रद्धा ठेवून काम करून फोंड्यावरती घाम गाळून मोत्यासारखी पिके आणली आहेत . श्रमाच्या वेलीला यशाची फुले येतात हे संपूर्ण पंचक्रोशीतील लोकांना दाखवून दिले. २० ते २५ गावासाठी हे गाव मध्यवर्ती ठिकाण असलेने अगदी सुरवातीपासून जिल्हा परिषदने या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्र स्थापन केले आहे .ज्यामध्ये दररोज शेकडो रुग्ण मोफत उपचार घेतात .गावच्या प्राथमिक शाळेने व ग्रामपंचायतीने निर्मल ग्राम ,ग्रामस्वच्छता अभियान ,१००% ई-लर्निग असलेली शाळा ,वृक्षारोपण ,क्रीडा व आरोग्य अशा सर्व उपक्रमात नाविन्यपूर्ण सहभाग नोंदविला आहे .  

                                गावामध्ये असणारे केदार्लिंग (खंबलिंग ) हे जागृत ग्रामदैवत असून पंचक्रोशीतील हजारो भाविकांचे श्रध्दास्थान आहे .वेगवेगळ्या उत्सवांच्या निमित्याने वर्षभरात या ठिकाणी ४ ते ५ लाख भाविक दर्शनाचा लाभ घेत असतात .नवरात्र महोत्सवात हजारो भाविक मंदिरात एकत्र येवून सत्संगाचे आयोजन केले जाते .यामध्ये व्याख्याने ,पोवाडे ,प्रवचन असे कार्यक्रम आयोजित करून समाजजागृती केली जाते .यावेळी पंचक्रोशीतील, महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्व भाविक खास दसऱ्यासाठी श्रद्धेने केदार्लिंग (खंबलिंग ) देवाच्या दर्शनसाठी गावी येतात .त्याचबरोबर गावातील व शाळेतील मुलांचा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करून मुलांच्या कलागुणांना वाव दिला जातो .याशिवाय गुढीपाडव्याच्या दिवशी हजारो भाविक एकत्र येवून आरोग्याचे प्रतिक  असणारा लिंब व गुळ यांचे मिश्रण प्रेमाने एकमेकांना वाटतात .तर यावेळी आपली मनोकामना पूर्ण झालेले भाविक देवाला आहेर व लोकांना पेढे घेवून येतात .त्यानंतर ग्रामसभा होवून पुढील वर्षातील उपक्रमांचे नियोजन केले जाते .याशिवाय दर रविवारी व पौर्णिमेला ढोलवाद्यांच्या गजरात देवाचा पालखी सोहळा आयोजीत केला जातो .ज्यामध्ये सुतार ,परीट ,नाभिक अशा सर्व जातीधर्माच्या लोकांना पालखी धरण्याचा मन दिला जातो. व राष्ट्रीय एकात्मता जोपासली जाते.             

                      केदार्लिंग (खंबलिंग ) मंदिर बरोबरच गावाच्या पश्चिमेला प्रसिध्द असे महादेव मंदिर आहे .सदगुरु बाळूमामाच्या दर्शनाला जाणारे हजारो भाविक याठिकाणी दर्शनासाठी येतात .याठिकाणी दर अमावस्येला प्रसाद व महाशिवरात्रीला विविध कार्यक्रम व महाप्रसादाचे आयोजन केले जाते . 

                      गावाला प्राचीन काळापासून वारकरी संप्रदायाची परंपरा आहे .त्यामुळे केदार्लिंग (खंबलिंग ) मंदिराशेजारी भव्य असे विठ्ठल मंदिर आहे येथे दरोरज काकड आरती,हरिपाठ व ग्रंथवाचन केले जाते .तसेच प्रत्येक एकादशीला कीर्तन ,प्रवचन व महाप्रसाद केला जातो .याशिवाय चैत्र एकादशीला ग्रामस्थामार्फत व गोकुळअष्टमिला पाटील कुटुंबीयामार्फत ७ दिवस हरीनाम सप्ताह व महाप्रसादाचे आयोजन केले जाते .याशिवाय मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या गणेश मंदिरामध्ये दर संकष्टीला व गणेशजयंतीनिमित्त प्रबोधनवर कार्यक्रम व महाप्रसाद असतो तर गावाच्या उत्तरेला असणाऱ्या हलसिद्धनाथ मंदिरामध्ये अक्षयतृतीयेला भगवान डोणे वाघापुरकर यांचा भाकणुकीच्या व महाप्रसादाचा कार्यक्रम असतो .           

                                गावामध्ये असणारी सर्व तरुण मंडळे विविध उपक्रमांच्या माध्यमातून भाषण स्पर्धा ,रांगोळी स्पर्धा ,चित्रकला स्पर्धा ,व्याख्याने असे कार्यक्रम ठेवून जनजागृती कार्य करतात तसेच केदार्लिंग (खंबलिंग ) देवाच्या यात्रेनिमित्य  कुस्तांचे आयोजन करून मल्लविद्येला प्रोत्साहन दिले जाते .त्यामुळे गावातील अनेक मल्ल राज्य व राष्ट्रीय पातळीवर चमकदार कामगिरी करत आहेत .  

Loading

× Chat Here